Sunday, 25 May 2014

 ।।श्री।।

आणखी दोन तुकडे..

आणि या लिंक्स्..

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGZXU5X2hMS3lXM0E/edit?usp=sharing

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGaE1hVWt6eVp2MFE/edit?usp=sharing
आणि आता काही तुकडे..

हे तुकडे का म्हणायचे?

अगदीच सोपं करून म्हणायचं तर..

कारण या कविता नाहीत, निबंध नाहीत, कादंब-या नाहीत, कादंबरिका नाहीत, लघुकथा नाहीत, दीर्घकथा नाहीत, नाटिका नाहीत, नाटक नाही, एकांकिका नाहीत, दीर्घांक नाहीत, नाट्यछटा नाहीत..इत्यादी..

परमेश्वर काय आहे हे जसं आपल्या परंपरेत नेति नेति म्हणत शोधतात..
तसंच हे लिखाण काय नाही हेच तेवढं लिहिताना मला माहीत होतं..

बारसं होऊन अधिकृत वगैरे नामकरणाच्या आधी जसं बाळ, बाळू, बाळ्या, छोट्या, गुंड्या, राजा..

तसे हे तुकडे..
आधी मुक्त शब्द मासिकातून वेळोवेळी प्रकाशित झालेले हे तुकडे आता खालील लिंकवर उपलब्ध असतील.

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGcEozaU5sQ1k1V3M/edit?usp=sharing

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGWjZVSURRdU01UVU/edit?usp=sharing

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGRkI3TjJRWnpKRHc/edit?usp=sharing
।।श्री।।

दर्शन दिवाळी 2005 मध्ये प्रकाशित झालेली माझी मुलाखत खालील लिंकवर उपलब्ध आहे.


https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGUVNiZUcwOFFRZnM/edit?usp=sharing


।।श्री।।

प्रेमस्वरूप आई ही माझी कथा मौज दिवाळी 2003 मध्ये प्रथम प्रकाशित झाली.

अर्थातंच ती त्याआधी च्या कथासंग्रहांत नाही. आता ती खालील लिंकवर वाचकांसाठी उपलब्ध आहे.

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGNmlHUU9kTWoyRDQ/edit?usp=sharing






Saturday, 24 May 2014


।।श्री।.

अंतर्नाद मुलाखत: मुलाखतकार- स्नेहा अवसरीकर

2003 मध्ये स्नेहा अवसरीकरनं अंतर्नाद या मासिकासाठी घेतलेली मुलाखत खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध होईल.


https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGQXVRWS1EUDE3LW8/edit?usp=sharing





In so far as I am I,

and only I am  I,
and I am only I

In so far as  I am inevitably and eternally alone, it is my last blessedness to know it, and to accept it and to live with this as the core of my self-knowledge.

-D.H. Lawrence

मी हा लेखक वाचलेला नाही. पण सुरुवातीलाच त्याचं हे वाक्य समोर आलं. कधीतरी वहीत लिहून ठेवलेलं. आणि आपल्याच बद्दल  दुस-याच कुणी अनोळखी इसमानं आपल्या नकळत काही जाणून नोंदलेलं असावं तसं वाटलं..

आपल्यालाच जाणवलेलं आणि लिहावंसं वाटलेलं जेव्हा दुसराच कुणितरी आणि तेही आधीच लिहून ठेवतो, तेव्हा आधी मन असूयेनं भरून जातं. 

पण नंतर असं वाटतं, की या सगळ्या एकटं पाडणा-या आणि एकटं करणा-या जगात कुठ तरी कुणीतरी आपल्यासारखं नेमकं वाटलेलं आणि  कळलेलं होऊन गेलं आहे.

 आणि मग या साद्यंत एकटेपणाच्या उन्हात सोबतीचं एक छोटंसं मृगजळ हेलावत राहातं. 

।।श्री।।

नमस्कार!

पूर्वी प्रकाशित होऊनही इतस्तत: विखुरल्यामुळे काही जणांना वाचायला न मिळालेले लेख ,मुलाखती आणि इतरही बरंच काही या ब्लॉगवर उपलब्ध असेल.

इन्शाल्लाह.. अर्थात् If God wills it.. म्हणजेच देवाची इच्छा असेल तर..