In so far as I am I,
and only I am I,
and I am only I
In so far as I am inevitably and eternally alone, it is my last blessedness to know it, and to accept it and to live with this as the core of my self-knowledge.
-D.H. Lawrence
मी हा लेखक वाचलेला नाही. पण सुरुवातीलाच त्याचं हे वाक्य समोर आलं. कधीतरी वहीत लिहून ठेवलेलं. आणि आपल्याच बद्दल दुस-याच कुणी अनोळखी इसमानं आपल्या नकळत काही जाणून नोंदलेलं असावं तसं वाटलं..
आपल्यालाच जाणवलेलं आणि लिहावंसं वाटलेलं जेव्हा दुसराच कुणितरी आणि तेही आधीच लिहून ठेवतो, तेव्हा आधी मन असूयेनं भरून जातं.
पण नंतर असं वाटतं, की या सगळ्या एकटं पाडणा-या आणि एकटं करणा-या जगात कुठ तरी कुणीतरी आपल्यासारखं नेमकं वाटलेलं आणि कळलेलं होऊन गेलं आहे.
आणि मग या साद्यंत एकटेपणाच्या उन्हात सोबतीचं एक छोटंसं मृगजळ हेलावत राहातं.
No comments:
Post a Comment