Sunday, 25 May 2014

आणि आता काही तुकडे..

हे तुकडे का म्हणायचे?

अगदीच सोपं करून म्हणायचं तर..

कारण या कविता नाहीत, निबंध नाहीत, कादंब-या नाहीत, कादंबरिका नाहीत, लघुकथा नाहीत, दीर्घकथा नाहीत, नाटिका नाहीत, नाटक नाही, एकांकिका नाहीत, दीर्घांक नाहीत, नाट्यछटा नाहीत..इत्यादी..

परमेश्वर काय आहे हे जसं आपल्या परंपरेत नेति नेति म्हणत शोधतात..
तसंच हे लिखाण काय नाही हेच तेवढं लिहिताना मला माहीत होतं..

बारसं होऊन अधिकृत वगैरे नामकरणाच्या आधी जसं बाळ, बाळू, बाळ्या, छोट्या, गुंड्या, राजा..

तसे हे तुकडे..
आधी मुक्त शब्द मासिकातून वेळोवेळी प्रकाशित झालेले हे तुकडे आता खालील लिंकवर उपलब्ध असतील.

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGcEozaU5sQ1k1V3M/edit?usp=sharing

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGWjZVSURRdU01UVU/edit?usp=sharing

https://drive.google.com/file/d/0B_erwfl5H1mGRkI3TjJRWnpKRHc/edit?usp=sharing

No comments:

Post a Comment